दिनांक 11 December 2018 वेळ 12:49 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » कोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी

कोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांकडून वांद्री धरणाची पाहणी

VANDRI DHARAN PAHNI

वार्ताहर/बोईसर, दि. 14 : पालघर तालुक्यातील गांजे-ढेकाळे येथील वांद्री धरण परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याच्या उद्देशाने शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी जिल्हाधिकार्‍यांसोबत येथील परिसराची पाहणी केली.

यावेळी धरण परिसर सुशोभित करण्याबरोबरच पर्यटकांच्या मनोरंजनासाठी नौकाविहार, कॅम्प साईट व फिशींग सारख्या सुविधा उपलब्ध करून देणे तसेच या परिसरातील स्थानिक आदिवासी लोकांना या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी करून घेऊन त्यांच्या घरी पर्यटकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करून त्यांना स्थानिक स्तरावर रोजगार मिळवून देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी कोकण विभागीय आयुक्त जगदीश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नरनावरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश दुसाने आदी उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top