दिनांक 21 May 2019 वेळ 10:25 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप

कातकरी उत्थान अभियानाअंतर्गत सापणे येथे दाखले वाटप

SAPNE DAKHLE VATAP-KATKARI UTHANप्रतिनिधी/वाडा, दि. 14 : तालुक्यातील सापणे बू. येथील अती असुरक्षित आदिम समाज म्हणून गणल्या जाणार्‍या कातकरी समाजाच्या सर्वेक्षणाला सुरवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज, बुधवारी (दि. 14) कोकण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते आदिवासी समाजातील नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्रातील कातकरी समाज हा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक बाबतीत इतर समाजांच्या मानाने खूप मागासलेला आहे. त्यामुळे या समाजाचे सर्वेक्षण करून त्यांच्या मागासलेपणाची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी आदिम कातकरी विकास संघटनेने लाऊन धरली होती. या मागणीला प्रतिसाद देत शासनाने मुंबई अर्थशास्र आणि सार्वजानिक धोरण संस्था (स्वायत्त), मुंबई विद्यापीठ यांच्या माध्यमातून अति असुरक्षित आदिम समाज प्रथम-रेषा सर्वेक्षण सुरु केले. या सर्वेक्षणातून समाजाच्या मागासलेपणाच्या अनेक त्रुटी समोर आल्या. या सर्वेक्षणात कातकारी समाजातील अनेक कुटुंबाकडे कोणत्याही प्रकारचे दाखले नसल्याचे आढळुन आले. त्यामुळे शासनाच्या अनेक योजना असूनही त्याचा फायदा या समाजाला होत नसल्याचे कारण पुढे आले. ही बाब ओळखून कोकण आयुक्तांच्या आदेशाने या समाजातील नागरिकांना उपलब्ध असलेल्या कगदपत्रांच्या अधारे जात प्रमाणपत्र, रहिवाशी दाखले, रेशन कार्ड तसेच इतर दाखल्यांसह घरकुलांच्या निधीचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, वाड्याच्या विभागीय अधिकारी अर्चना कदम, तहसीलदार दिनेश कुर्‍हाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी हजर होते.

कातकरी समाजाचे मागसलेपण संपवून त्यांना समाजाच्या मूळ घटकात आणण्यासाठी सर्वप्रथम या समाजाचे स्थलांतर रोखण्याची गरज आहे. भविष्यात या समाजासाठी अनेक उपक्रम राबविले जातील व शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल. मात्र कातकरी समाजाला पुढे जाण्यासाठी इतर समाजांचा हातभारही महत्वाचा असेल, असे मत यावेळी कोकण आयुक्त डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top