दिनांक 11 December 2018 वेळ 1:39 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » बंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी

बंदुकीतून चुकून सुटलेल्या गोळीने घेतला भावोजीचा बळी

Gun-Firing_2017071806वार्ताहर/बोईसर, दि. 13 : दिवाळीत घरी आलेल्या नातलगांना काडतुसांनी भरलेली बंदूक दाखवत असताना अनावधानाने बंदुकीतून सुटलेल्या गोळीने बहिणीच्या नवर्‍याचा बळी घेतल्याची घटना बोईसर जवळील शिगाव गावात घडली आहे. हरी बच्चू गडग (वय 39) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असुन याप्रकरणी लहान्या सदु भोईर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरी गडग हे दिवाळी निमित्त शुक्रवारी (दि. 9) आपल्या पत्नी व मुलांसह सासुरवाडीला आले होते. रात्री 9 च्या सुमारास जेवण झाल्यानंतर हरी गडग व लहान्या भोईर गप्पा मारत असताना लहान्या भोईरने आपल्याकडील बंदुक गडग यांना दाखवत असताना त्याच्या हातून अचानक बंदुकीचा चाप ओढला गेला, त्यामुळे बंदुकीतून सुटलेली गोळी थेट गडग यांच्या छातीत घुसली. यात गंभीर जखमी झाल्याने गडग यांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असुन गडग यांचा पुतण्या सागर गडग याने शनिवारी (दि.10) दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 304 तसेच आर्म अ‍ॅक्ट कलम 3 व 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास आरोपी लहान्या भोईर याला अटक करण्यात आली आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top