दिनांक 03 July 2020 वेळ 4:54 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » सापणे गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला पिंजाळ वनराई बंधारा

सापणे गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधला पिंजाळ वनराई बंधारा

SAPNE BANDHARA

प्रतिनिधी/वाडा, दि. 11 : यावर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई जाणवणार असून भविष्यात उद्भवू शकणार्‍या या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील सापणे बु. येथील ग्रामस्थांनी पिंजाळ नदीवर लोकसहभागातून वनराई बंधार्‍याची उभारणी केली आहे. श्रमदानातून उभारण्यात आलेला हा बंधारा गावाच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी निश्चितच वरदान ठरणार आहे.

सापणे बु. गावाच्या परिसरातील नागरिकांना पिंजाळ नदी जवळ असूनही नदीवर बंधारा नसल्याने उन्हाळ्यात पाण्याच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जावे लागते. त्यावर मात करण्याकरता ग्रामस्थांनी लोक सहभागातून बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे या कामाकरता शासनाकडून कोणत्याही स्वरुपाची मदत घेण्यात आलेली नाही. बंधार्‍यात साठविलेल्या पाण्यामुळे भाजीपाला पिकांसोबत गावातील विहरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन त्याचा फायदा ग्रामस्थांना होणार आहे. हा वनाराई बंधारा बांधण्यासाठी गावातील ग्रामस्थांसह विद्यार्थी व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  • पिंजाळ नदीवर पक्क्या बंधार्‍याची गरज
    सापणे बु. येथील पिंजाळ नदीवर सिमेंटच्या पक्क्या बंधर्‍याची गरज आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी याबाबत मागणी करुनही आजपर्यंत येथे बंधारा बांधण्यात आलेला नाही. या बंधार्‍यामुळे वाडा तालुक्यातील सापणे बु, करांजे, सापणे खुर्द ही गावे, विक्रमगड तालुक्यातील कावळे, माले तसेच अनेक पाड्यांतील नागरिकांना व शेतकर्‍यांना फायदा होऊ शकतो. मात्र प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे येथे आजपर्यंत बंधारा झाला नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top