शेजाऱ्याची भिंत झोपडीवर कोसळली; महिला ठार

0
11

Rajtantra Media

डहाणू दि. ७: आज लक्ष्मीपूजनाची पहाट एका महिलेच्या आयुष्याची दोरी कापणारी ठरली. डहाणू तालुक्यातील आगवन मोठापाडा येथील रानु पद्मा माच्छी (६०) या विधवेच्या झोपडीवर आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास ती गाढ झोपेत असताना शेजारील घराची भिंत कोसळून झालेल्या झालेल्या अपघातात रानु ढिगाऱ्याखाली गाडली गेली. गंभीर जखमी अवस्थेत तिला डहाणूच्या उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. नेहमी प्रमाणेच उप जिल्हा रुग्णालयाने हात वर केल्याने रानुला वलसाड (गुजरात) येथे हलविण्यात आले. मात्र तेथे पोहोचेपर्यंत रानुने दम तोडला होता. तिच्या पश्चात ३ मुले असून त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. शासनाकडून या कुटूंबाला आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments