दिनांक 24 February 2020 वेळ 7:51 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जिल्ह्यातील 14 शाळाबाह्य विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात दाखल

जिल्ह्यातील 14 शाळाबाह्य विद्यार्थी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात दाखल

  • जिल्ह्यातील 4500 विद्यार्थी आजही शिक्षण हक्कापासून वंचित.
  •  रोजीरोटीने दिला शिक्षणहक्कावर पाय.

SHALABAHYA VIDYARTHI1प्रतिनिधी/मोखाडा, दि. 4 : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारान्वये शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा सामील करून घेण्यात येत आहे. त्यानुसार मोखाडा तालुक्यातील पोशेरा, दांडवळ व इतर भागातील 14 विद्यार्थ्यांना शाळाबाह्य शिक्षण कार्यक्रमाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (मुंबई) नुतन मघाडे यांच्या जागरूकतेमुळे शाळेत दाखल करून घेण्यात आले आहे. यातील 11 विद्यार्थ्यांना नाशिक तालुक्यातील जातेगांव येथे शिक्षण हमी कार्डाद्वारे पुर्नप्रवेश देण्यात आलेला आहे. दरम्यान, आजही जिल्ह्यातील 4500 विद्यार्थी शिक्षणाच्या गंगोत्रीपासून कोसो दुर आहेत.

मोखाडा तालुक्यातील पोशेरा व दांडवळ गांवांतील साजन चंदर पवार (इ. 5 वी, 3 वर्षे शाळाबाह्य), उज्वेश दीपक पवार (इ. 4 थी, 2 वर्षे शाळाबाह्य, पांडूरंग ईश्वर वाघ (इ. 7 वी, 2 महिने शाळाबाह्य), विशाल लक्ष्मण वाघ (इ. 7 वी, 1 वर्षे शाळाबाह्य), अजय पिंटू वळवी व विश्वनाथ चंदर पवार (पहिली पासून शाळाबाह्य), संपत चंदर पवार (इ. 2 री, 4 वर्षे शाळाबाह्य), अमोल चंदर पवार (इ. 3 री, 2 वर्षे शाळाबाह्य) मनिष सिताराम पवार (इ. 6 वी जुनपासून शाळाबाह्य), दर्शना शिवराम कडाळे (पहिलीपासून शाळाबाह्य), पिंट्या शांताराम तुंबडे (दुसरीपासून शाळाबाह्य) आदी 11 विद्यार्थ्यांना नाशिक तालुक्यातील जातेगाव शाळेत शिक्षण हमी कार्डानुसार पुर्नप्रवेशीत करण्यात आले आहे. तर अन्य तिघांनाही अशाचप्रकारे प्रवेश मिळवून देण्यात आल्याची माहिती पालघरचे समता विभाग प्रमूख तानाजी आनंदा डावरे यांनी दिली आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिनियमानुसार शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुळप्रवाहात सामिल करून घेणे बंधनकारक आहे. परंतू आजघडीला असंख्य बालके शाळाबाह्यच असल्याचे विदारक चित्र आहे. आदिवासीबहूल पालघर जिल्ह्यातील 47 शाळाबाह्य व सतत गैरहजर असलेली 4,384 अशी एकूण 4,437 इतक्या मोठ्या प्रमाणावर बालके हक्काच्या शिक्षणापासून वंचित आहेत. अशा शाळाबाह्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि अव्याहत शिक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र स्थानिक ठिकाणी रोजगार नसल्याने पालकांना रोजीरोटीसाठी इतस्ततः भटकावे लागत असल्याने त्यांच्या पाल्यांना किमान प्राथमिक शिक्षणालाही पारखे राहावे लागत असल्याची जळजळीत वस्तूस्थिती आहे.

SHALABAHYA VIDYARTHI2
पालघर जिल्ह्यातून बहूतांश कुटूंबे ही तब्बल 8-8 महिने रोजगारासाठी शहरांकडे धाव घेत असतात. पर्यायाने त्यांच्या पाल्यांचीही सार्वत्रिक फरपट होत असते. परिणामी त्यांच्या शिक्षणांतही कमालीचा खंड पडतो. अशा वंचित बालकांचा शोध घेऊन त्यांना असतील तिथेच पुन्हा शिक्षणाचे दरवाजे उघडे करून देण्यासाठी शिक्षण विभागाकडून एक व्यापक चळवळ उभी केली जात आहे. यात बालरक्षक हा घटक महत्वाची भुमिका बजावत आहे. अशा प्रकारे जिल्हाभरात 2516 बालरक्षकांच्या माध्यमातून शाळाबाह्य मुलांच्या शैक्षणिक सहभागाचा भार उचलण्यात येणार आहे. तथापी अध्यापणा व्यतिरिक्त बालरक्षक पदाची जबाबदारी दिलेले असे बालरक्षक हे किती प्रभावीपणे काम करतात यावरच शाळाबाह्य बालकांचे शैक्षणिक भवितव्य अवलंबून राहणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top