दिनांक 19 November 2018 वेळ 10:50 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » शांती रतन विद्यामंदिराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू! -सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

शांती रतन विद्यामंदिराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू! -सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

SHANTIRATAN VIDYAMANDIR

राजतंत्र मीडिया/बोईसर दि. 4 : आदिवासी भागात काम करणार्‍या पंचतत्व सेवा संस्था संचलित शांती-रतन विद्यामंदिराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या शाळेतील सर्व 754 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व मिठाई वाटपाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंचतत्व सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर राऊळ, आमदार रविंद्र फाटक, आमदार अमित घोडा, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश शहा व वसंत चव्हाण, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, कोकण विभाग पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी, परोपकार संस्थेचे अध्यक्ष शंकर केजरीवाल उपस्थित होते.

विक्रमगड तालुक्यातील कोंडगाव येथे सुरु करण्यात आलेल्या या शाळेतील सर्व 754 विद्यार्थ्यांना यावेळी मोफत गणवेश वाटप करण्यात आले. संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी काढलेल्या विमाकवचाचे ना. शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. याचवेळी रोटरी क्लब ऑफ बाँबे वेस्ट या संस्थेने बांधून दिलेल्या शौचालयाचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार गावित यांनी शाळेसाठी आपल्या खासदार निधीतून 10 लाख रुपये तर आमदार रविंद्र फाटक यांनीही आमदार निधीतून 10 लाख रुपयांचे अर्थ सहाय्य जाहीर केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून राऊळ यांनी शाळा चालविण्यास सहाय्य करणार्‍या सर्व देणगीदारांचे आभार मानले तसेच शाळेस मान्यता मिळवून देण्यास सहाय्य करणार्‍या ना. शिंदे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करुन भविष्यात शाळेला अनुदान प्राप्त व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ख्रिस्ती मिशनऱ्या लोकांच्या गरिबीचा फायदा घेत धर्मांतरे घडवून आणत असून त्याला आळा घालायचा असेल तर आदिवासी भागात शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यासाठी दानशूर लोकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन राऊळ यांनी केले.

उपस्थित मान्यवरांनी प्रभाकर राऊळ यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला व त्यांना सर्वतोपरी सहाय्य देण्याची ग्वाही दिली.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top