दिनांक 30 May 2020 वेळ 9:34 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » सापने गावात डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळल्याने भितीचे वातवरण

सापने गावात डेंग्यू सदृश्य तापाचे रुग्ण आढळल्याने भितीचे वातवरण

WADA DENGUEप्रतिनिधी/वाडा, दि. 1 : तालुक्यातील सापने गावात तापाची साथ पसरली असून त्याची दहा रूग्णांना लागण झाली आहे. या रूग्णांवर विविध खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु हा ताप डेंग्यूचा असावा, असा संशय व्यक्त केला जात असल्याने गावात तसेच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दिनेश पिंगळे (वय33) व दिप्ती पिंगळे (29) या रूग्णांवर ठाणे येथील खाजगी रूग्णालयात तर उमेश काळे (17), लक्ष्मी काळे (67), उज्वला काळे (32), नितीन भोईर (26), छगन काळे (25), महादेव काळे (62), रामचंद्र पिंगळे (71), आराध्य पिंगळे (80) या रूग्णांवर वाडा येथील विविध खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ताप येणे, अंग दुखणे, खोकला अशी लक्षणे या रुग्णांमध्ये आढळून आली असुन वाडा आरोग्य विभागाने या रूग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी डहाणू येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या नमुन्यांची येत्या 48 तासात तपासणी होऊन नेमके निदान समजू शकेल, अशी माहिती तालुका आरोग्य पर्यवेक्षक सी. व्ही. लिंगायत यांनी दिली.

दरम्यान, गावात आरोग्य पथक तैनात करण्यात आले असून जनजागृती व उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच डास नाशक धुरफवारणी उद्यापासुन सुरु करण्यात येईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top