दिनांक 17 January 2020 वेळ 9:10 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू-विरारदरम्यान 4 नविन लोकल फेर्‍या सुरु!

डहाणू-विरारदरम्यान 4 नविन लोकल फेर्‍या सुरु!

> डहाणू वैतरणा प्रवासी संस्था व शिवसेनेकडुन नवीन लोकलचे जल्लोषात स्वागत

NAVIN LOCALवार्ताहर/बोईसर, दि. 1 : डहाणू ते वैतरणा पट्ट्यातील प्रवाशांची मागणी लक्षात घेता पश्‍चिम रेल्वेकडून आज, 1 नोव्हेंबरपासुन या मार्गावर चार नविन लोकलफेर्‍या सुरु करण्यात आल्या असुन यासाठी सतत पाठपुरवठा करणार्‍या डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, पालघर शिवसेना तसेच रेलफॅन संस्थेनेे प्रत्येक स्थानकांवर नविन लोकलचे जल्लोषात स्वागत केले.

नविन वेळापत्रकानुसार चर्चगेटहून सकाळी 9 वाजता तर विरारहून दुपारी 3 वाजुन 45 मिनिटांनी डहाणूसाठी नविन लोकलफेर्‍या सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच डहाणूवरुन दुपारी 1 वाजुन 40 मिनिटांनी व संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी विरारसाठी लोकल सुटणार आहे. डहाणू वैतरणा प्रवासी सेवा भावी संस्था व पालघर विधानसभेचे आमदार अमित घोडा यांनी या नविन लोकल फेर्‍यांसाठी सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश असुन पश्‍चिम रेल्वेकडून आजपासुन या लोकल फेर्‍या सुरु करण्यात आल्या. यानिमित्ताने डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, पालघर शिवसेना तसेच रेलफॅल संस्थेतर्फे वैतरणा, सफाळे, केळवे, पालघर, उमरोळी व डहाणू स्थानकावर मोटरमनला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच नविन लोकफेर्‍या सुरु करण्यात मोलाची भूमिका बजावणारे डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे प्रथमेश प्रभुतेंडोलकर यांचा प्रवाशांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

NAVIN LOCAL1

दरम्यान, आमदार अमित घोडा यांनी आज प्रवाशा़ंसह नविन लोकमध्ये प्रवास केला. याप्रसंगी शिवसेनेचे पालघर जिल्हा सह संपर्क प्रमुख केतन पाटील, जिल्हा प्रमुख राजेश शहा, पंचायत समिती सभापती मनिषा पिंपळे, पालघर तालुका प्रमुख विकास मोरे, युवासेना सचिव परीक्षित पाटील, पालघर जिल्हा युवा अधिकारी जस्वीन घरत, पालघर पंचायत समितीचे माजी सभापती रविंद्र पागधारे, पालघर शहर प्रमुख भूषण संखे, पालघर शहर समन्वक सुनिल महेंद्रकर, माजी पालघर नगराध्यक्षा प्रियांका पाटील, माजी उपनगराध्यक्ष उत्तम घरत, लिना पाटील, जितेंद्र पामाळे आदींसह शिवसेनेच्या महिला आघाडी कार्यकर्त्या व डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

 

 

comments

About Rajtantra

Scroll To Top