डहाणू : शुभम, नवघरे आणि दिनेश ज्वेलर्सवर आयकर विभागाचा ससेमिरा

0
22

RAJTANTRA MEDIA/डहाणू दि. ३०: येथील आघाडीच्या ३ सुवर्णकारांची आयकर विभागाने स्वतंत्र पथके धाडून छाननी सुरु केली आहे. यामध्ये डहाणू व परिसरात सर्वप्रथम सोने चांदीची शुद्धता पडताळणी करणारे मशिन आणून या व्यवसायातील गणिते बदलणारे शुभम ज्वेलर्स (मेन रोड), डहाणूतील सर्वात मोठे ज्वेलरीचे दुकान नवघरे ज्वेलर्स (मेन रोड) आणि दिनेश ज्वेलर्स (इराणी रोड) यांचा समावेश आहे. काल रात्री उशीरा या दुकानांवर आयकर विभागाची पथके धडकली असून त्यांच्या तपासणीचे काम सध्याही चालू आहे. आयकर विभागाला या पडताळणीत काही गवसले किंवा नाही याबाबतचा तपशील समजू शकलेला नाही.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments