दिनांक 22 August 2019 वेळ 2:24 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » रेशनकार्डासाठी नागरिकांची ससेहोलपोट

रेशनकार्डासाठी नागरिकांची ससेहोलपोट

>> वाडा पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार 

WADA PURAVTHA VIBHAGप्रतिनिधी/वाडा, दि. 29 : वाडा पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील नागरिकांना रेशनकार्डासाठी वारंवार इतर कामधंदे सोडून कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत असून पुरवठा विभागाच्या कारभारात लवकरात लवकर सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.

वाडा तहसीलदार कार्यालया अंतर्गत पुरवठा शाखा असून या शाखेमार्फत रेशनकार्ड संदर्भातील कामे केली जातात. नविन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्डात विवाहित महिलांची व लहान मुलांची नावे समाविष्ट करणे, लग्न झालेल्या मुलींची नावे कमी करणे, नावात दुरूस्ती करणे आदी स्वरुपाची कामे या कार्यालयामार्फत केली जातात. मात्र या कामासाठी एकच कर्मचारी असल्याने नागरिकांना यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. तालुक्यातील नागरिक ग्रामीण भागातून येथे इतर कामे सोडून आपल्या कामासाठी वारंवार हेलपाटे मारत असून त्यांना या कामासाठी महिनोंमहिने लागत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या कामासाठी सात ते पंधरा दिवसांचा कालावधी अपेक्षित असताना दीड ते दोन महिने लागत असल्याने पुरवठा विभागाच्या कासवगती कामाबद्दल नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने आथिर्क व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. रेशनकार्ड संदर्भातील विविध कामे करताना मुळ रेशनकार्ड घेतले जाते. त्यामुळे इतर कामासाठी रेशनकार्डची गरज भासल्यास ते मिळत नसल्याने नागरिकांची इतरही कामे खोळंबतात. तसेच कामासाठी आलेल्या नागरिकांना कर्मचार्‍याकडून उर्मट उत्तरे दिली जातात, अशी तक्रार रेशनकार्ड धारकांची आहे.

दरम्यान, या कार्यालयात कर्मचारी वाढवून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मी माझ्या नातीचे नाव रेशन कार्डात टाकण्यासाठी 6 सप्टेंबर 2018 रोजी या कार्यालयाकडे अर्ज केला आहे. मात्र अद्यापपर्यंत मला रेशनकार्ड मिळू शकलेले नाही.
-पांडुरंग पाटील,
रेशनकार्ड धारक.

रेशनकार्डाची कामे करण्यासाठी कर्मचारी कमी असल्याने नागरिकांना विलंब होतो. यात सुधारणा केली जाईल.
-दिनेश कुर्‍हाडे,
तहसीलदार, वाडा

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top