दिनांक 03 July 2020 वेळ 4:46 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मोखाडा तालुक्यातील शेकडो मजूर विस्थापनाच्या वाटेवर

मोखाडा तालुक्यातील शेकडो मजूर विस्थापनाच्या वाटेवर

>> रोहयो यंत्रणांची दिरंगाई   >> शास्वत रोजगाराची टंचाई

MOKHADA MAJOOR

प्रतिनिधी/मोखाडा, दि. 29 : मोखाडा तालुक्यात दरवर्षी रोजगारा अभावी मोठ्या प्रमाणावर मजूरांचे स्थलांतर होत असते. पावसाळ्याचे काही दिवस सोडले तर बहूतांश महिने येथील बहूसंख्य मजूर रोजगाराच्या शोधार्थ इतरत्रच भटकत असतो. चालू वर्षीही तालुक्यातील 50 टक्के मजूर विस्थापणाच्या वाटेवर आहेत. तथापी 365 दिवस रोजगाराची हमी देणार्‍या यंत्रणा मात्र आजही सुस्त असल्याचे चित्र आहे. त्यामूळे रोजगार विन्मूख मजूरांना अनंत अडचणींशी सामना करावा लागत असतो.

तालुक्यात मजूर वर्गाचे एकूण 17 हजार 89 कुटूंब असून 47 हजार 626 एवढ्या मोठ्या संख्येने मजूर वर्ग आहे. मात्र मागील आर्थिक वर्षात सर्व रोहयो यंत्रणा मिळून केवळ 16 हजार 362 मजूरांच्या हाताला काम देण्यात आले होते. चालू वर्षी आजघडीला केवळ 17 कामे सुरू असून 1068 मजूर कामावर आहेत. यामध्ये फळबाग लागवड, पुनर्निमीती, घरकुल, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड इतकीच कामे चालु आहेत. यातील बहूतेक कामे ही सामाजिक वनीकरण व पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागांची आहेत. तर जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि प्रामूख्याने रोहयोमधील 50 टक्के कामांचा भार असलेल्या ग्रामपंचायतींकडून रोजगार निर्मितबाबत कमालीची हेळसांड केली जात आहे. वास्तविकतः मागेल त्याला काम हे शासनाचे मुळ उद्दिष्ट असतानाही शेकडो मजूरांना दरवर्षी रोजगारासाठी विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर घेऊन, घरदार वर्‍यावर सोडून तब्बल 8 महिने गावोगावी भटकावे लागत असते. 

मजूर होतात दुर्घटनांचे शिकार
तालुक्यातील मजूर दरवर्षी ऊसतोडणी, खाणकाम, रेतीबंदर, विटभट्टी आणि सालाने सुरगाना, हरसुल, पेठ, ठाणे, नाशिक आदि ठिकाणी जात असतात. या ठिकाणी त्यांची आर्थिक आणि शारिरीक पिळवणूक होत असते. प्रसंगी आपला जीवही गमवावा लागत असल्याचे असंख्य उदाहरणे आहेत.

पाल्यांची शैक्षणिक आबाळ
तब्बल 8 महिन्यांच्या दीर्घ कालावधीसाठी कुटूंबकबीला घेऊन बाहेरगावी रहावे लागत असल्याने मजूरांचे असंख्य पाल्ये आजही शाळाबाह्य आहेत. त्यामूळे एकही मुल शाळाबाह्य राहू नये या शासनाच्या धोरणालाच हरताळ फासला जात आहे.

कुपोषण वाढिला मदत
स्थानिक ठिकाणीच मुबलक आणि शास्वत रोजगार उपलब्ध होणे ही मजूरांची गरज आहे. हातात खेळता पैसा नसल्याने व रोजगाराचीही परवड असल्याने पोराबाळांची खायची आबाळ होते व पर्यायाने कुपोषण वाढीला मदत होते. त्यामूळेच आजघडीला जोमाने होत असलेली बालकांची कोवळी पानगळ थांबत नसल्याचे विदारक चित्र आहे. केवळ जुजबी उपाययोजना माथी मारून प्रशासन हात झटकीत असल्याने तालुक्यातील कुपोषणाबाबत वनी उगवती कुणी न पुसती, अनेक कुसूमे वाया जाती; असे म्हणणे वावगे ठरू नये.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top