डहाणूत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जोरदार शक्तीप्रदर्शन

0
13

Rajtantra Media/डहाणू दि. २९: विजेचे भार नियमन बंद करा, रेशन धान्य ऑफलाइन पद्धतीने द्या, सुका दुष्काळ जाहीर करा, बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करा या व अशा विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. विधानपरिषद सदस्य आनंद ठाकूर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, तालुका अध्यक्ष काशिनाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने लोक सामील झाले होते. विरोधी पक्ष म्हणून पहिल्यांदाच राष्ट्रवादीने इतके मोठे शक्तीप्रदर्शन करुन आगामी २०१९ च्या निवडणूकीसाठी तयार असल्याचे संकेत दिले.

Print Friendly, PDF & Email

comments