दांडेकर महाविद्यालयात आयोजित अभिरूप न्यायालयात रंगले युक्तीवाद

0
18

DANDEKAR ABHIRUP NYAYALAY1वार्ताहर/बोईसर, दि. 28 : सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या विधी महाविद्यालयात ज्येष्ठ सरकारी वकील अ‍ॅड. दत्तरंगे व विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा यांच्या मार्गदर्शनाखाली अभिरूप न्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यावेळी फौजदारी प्रकरणावर विद्यार्थ्यांमध्ये चांगलाच युक्तीवाद पहायला मिळाला.

दांडेकर महाविद्यालयात विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांकरिता सरावासाठी प्रथमच अशा अभिरूप न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायालयात एक फौजदारी प्रकरण घेऊन त्यावर प्रारंभापासून ते अंतिम निर्णयापर्यंत सर्व बाबींवर विशेष चर्चा करून, प्रत्येक पैलूचा उलघडा करत प्रत्याक्षिक सादर झाले. यामध्ये तक्रादाराने केलेली तक्रार, पहिली खबर, त्यानंतर केलेला पंचनामा, पोलिसांनी तयार केलेले दोषारोपपत्र, गुन्ह्याचा तपास, वेगवेगळ्या प्रकारचे पंचनामे, मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया, साक्ष घेण्याच्या पध्दती, पुरावा पडताळणी अहवाल, प्रकरण कोर्टात सादर करण्याची प्रक्रिया, सरकारी वकिलाच्या मदतीने न्यायालयाच्या कामकाजात मदत करणे, न्यायालयाच्या प्रत्यक्ष कामात सहभागी होणे व निर्णयापर्यंत संबंधीत घटनेची इत्यंभूत माहिती नोंदवणे व संकलीत करणे, असे सर्व न्यायालयीन कामकाजाचे पैलू उलगडण्यात आले. यावेळी अ‍ॅड. राजेश मोगरे व अ‍ॅड. नचिकेत तरडे यांनी न्यायाधिशाचे काम पार पाडले. दरम्यान, अ‍ॅड. दत्तरंगे यांनी याप्रसंगी विधी अभ्यासक्रमाबाबत सखोल मार्गदर्शन करून न्यायालयाची भूमिका समजावून सांगितली.

DANDEKAR ABHIRUP NYAYALAY2

या कार्यक्रमास अ‍ॅड. रमेश पाल, अ‍ॅड. कमलेश भगत, अ‍ॅड. राहूल ठाकरे, अ‍ॅड. ज्योती पाल आदी मान्यवर उपस्थित होते.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments