दिनांक 22 August 2019 वेळ 3:08 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वांगणी आश्रम शाळेत फुलली परसबाग

वांगणी आश्रम शाळेत फुलली परसबाग

परसबागेतील फळभाज्यांचा मुलांना पौष्टीक आहार

परसबागेतील फळभाज्यांचा मुलांना पौष्टीक आहार

प्रतिनिधी/जव्हार, दि. 28 : जव्हार आदिवासी प्रकल्पातील अतिदुर्गम डोंगर भागात वसलेल्या वांगणी आश्रम शाळेतील विद्यार्थी व कर्माचार्‍यांनी आश्रम शाळेच्या परिसरातील मोकळ्या जागेत परस बाग फुलवली आहे. या बागेत भाजीपाला लागवड करण्यात आला असून या भाज्या मुलांना पौष्टीक आहार म्हणून दिल्या जाणार आहेत. दरम्यान, या प्रयोगाने शाळेचा चेहरामोहरा बदलला असुन तालुक्यासह आदिवासी विकास प्रकल्पात हा चर्चेचा विषय बनला आहे.

1 ली ते 10 पर्यंत वर्ग असलेल्या वांगणी आश्रम शाळेत 425 विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. गेल्या वर्षी दयनिय अवस्था झाल्याने शाळांच्या सर्वेक्षणात वांगणी आश्रम शाळेला ’ड’ गटात स्थान देण्यात आले होते. त्यामुळे शाळेला टाळे ठोकण्याची वेळ आली होती. अशा परिस्थितीत शालेय व्यवस्थापन समितीने पुढाकार घेत शिक्षक कर्मचार्‍यांची तात्काळ भर्ती करत शाळेची परिस्थिती सुधारली व पुढे नवनविन प्रयोग राबवत शाळेचा कायापालट केला.

आश्रम शाळेत फुलवलेल्या या परसबागेत विविध फळभाज्या, औषधी वनस्पती, फुल झाडांसह एकूण 450 वेगवेगळ्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. तर आतापर्यंत पिकलेल्या डांगर, दुधी भोपळ्यासारख्या 400 किलो भाज्यांचा विद्यार्थ्यांच्या आहारात वापर करण्यात आला आहे. तसेच वाल पापडीसाठी मांडव टाकून जवळपास 3 गुंठ्यात वाल पापडीची लागवड केली आहे. त्यामुळे काही दिवसातच वाल पापडीची भाजीही विद्यार्थ्यांच्या आहारात दिसणार आहे.

दरम्यान, वांगणी आश्रम शाळा हिरवीगार झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये तर आनंदच आहे. मात्र त्याअधिक शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांना आनंद झाल्याचे येथील शिक्षकांनी सांगितले.

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?

  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top