दिनांक 03 July 2020 वेळ 5:08 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » शालेय पोषण आहारात घपला, डोल्हारा शाळेचे मुख्याध्यापक निलंबित

शालेय पोषण आहारात घपला, डोल्हारा शाळेचे मुख्याध्यापक निलंबित

  • मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची कारवाई
  • व्यवस्थापण समितीने केली होती तक्रार

SHALEY POSHAN AAHAR GHAPLAप्रतिनिधी/मोखाडा, दि. 28 : तालुक्यातील डोल्हारा जिल्हा परिषद केंद्र शाळेत 28 ऑगस्ट 2018 रोजी करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या पुरवठ्यात 250 किलो तांदूळ कमी आढळून आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेऊन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद बोरीकर यांनी मुख्याध्यापक राजेश सुधाकर गवई यांना निलंबीत केले आहे. शालेय व्यवस्थापन समितीने याबाबत तक्रार केली होती.

जळगांवमधील साई मार्केटींग एँड ट्रेडींग या ठेकेदार कंपनीमार्फत दिनांक 28 ऑगस्ट 2018 रोजी डोल्हार शाळेला तांदूळ, कडधान्य, डाळ, तेल व मसाल्याचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र या पुरवठ्यापैकी 2 क्विंटल 50 किलो तांदूळ प्रत्यक्षात कमी आढळुन आल्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघूनाथ बोढेरे यांनी याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत या तक्रारीत तथ्य आढळल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपील नियम 1964 चा नियम 3 (1) अन्वये मुख्याध्यापक राजेश सुधाकर गवई यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments

About Rajtantra

Scroll To Top