कोकण पाटबंधारे महामंडळाच्या उपाध्यक्षांनी केली सूर्या तीर कालव्याची पाहणी

0
16

KALVE PAHANIवार्ताहर/बोईसर, दि. 28 : पालघर जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पांतर्गत शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या सूर्या उजवा तीर कालव्याची काल, शनिवारी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनी पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी कालव्यांच्या आवश्यक त्या ठिकाणी लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.

सुर्या उजवा तिर कालव्यामधून डहाणू व पालघर तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी सिंचनाची सोय होते. मात्र शेतापर्यंत पोहचणार्‍या कनॉलच्या दुरावस्थेमुळे अनेक शेतकरी धरणाच्या पाण्यापासून वंचित राहात असल्याच्या पार्श्‍वभुमीवर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष धोडी यांच्यासह शिवसेनेचे पालघर लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा व डहाणू तालुका प्रमुख अशोक भोईर यांनी पालघर तालुक्यातील शिगाव तसेच डहाणू तालुक्यातील मोगरबाव, साखरे, रानशेत या गावातील नादुरुस्त कालवे, मोरी आणि पूलांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान कालव्यांची अनेक ठिकाणी दुरावस्था झाली असून कालवे फुटले असल्याचे निदर्शनास आले. तसेच त्यावर असणार्‍या पुलांची स्थिती देखील खराब झाली असल्याने आवश्यक त्या ठिकाणी लवकारात लवकर दुरुस्त्या करण्याचे निर्देश धोडी यांनी यावेळी दिले.

पालघर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश दुसाने उप अभियंता माने व शाखा अभियंता जाधव यांना नादुरुस्त कालवे आणि पूलांची त्वरित दुरुस्ती करून येत्या रब्बी हंगामात जास्तीत जास्त शेती क्षेत्राला पाणी देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments