पश्चिम रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे डहाणूरोड स्थानकात शुकशुकाट

0
13

MEGA BLOCKप्रतिनिधी/डहाणू, दि. 28 : पश्चिम रेल्वेच्या सफाळा स्टेशनवर न्यू इलेक्ट्रोनिक इंटरलॉकिंगच्या कामानिमित्त आज, 28 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील काही लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकलच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गुजरातकडून येणार्‍या काही गाड्या पालघर आणि डहाणूपर्यंतच सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे डहाणू रोड रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट दिसुन येत आहे. दरम्यान लांब पल्ल्याच्या इतर गाड्या अर्धा ते एक तास उशीराने धावत असल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागल्याचे चित्र आहे.

काल, शनिवारी संपूर्ण दिवस डहाणू स्थानकांत उद्घोषणा करून प्रवाशांना मेगा ब्लॉकबाबत माहिती देण्यात येत होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही. रविवार असल्याने शासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांना सुट्टी असली तरी सकाळी कामावर निघालेल्या औद्योगिक क्षेत्रातील कर्मचार्‍यांना थोडा त्रास सहन करावा लागला. तसेच दिवाळी निमित्त मुंबईला खरेदीसाठी जाणार्‍यांचा देखील ब्लॉकमुळे हिरमोड झाला. गाडीतील खाद्य पदार्थ विक्रेत्यांनाही सक्तीची रजा घ्यावी लागली असुन डहाणू स्थानकात पूर्व व पश्चिमेकडील वाहन तळावर रेल्वे प्रवाशांची वाहनांची संख्या नेहमीच्या तुलनेत कमी प्रमाणात दिसत आहेत.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments