दिनांक 19 November 2018 वेळ 10:50 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » कासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला

कासा : एकाच दिवसात 1 कोटींचा गुटखा पकडला

राजतंत्र मीडिया/डहाणू, दि. 22 : गुजरात राज्यातून महाराष्ट्रात बेकायदा विक्रीसाठी आणला जात असलेला तब्बल 1 कोटी 6 लाख रुपये किंमतीचा गुटखा अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी पकडला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा हद्दीतील घोळ टोलनाक्यावर शुक्रवारी (दि. 19) ही कारवाई करण्यात आली.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महामार्गावरील घोळ टोलनाक्यावर अन्न सुरक्षा अधिकार्‍यांकडून वाहनांची तपासणी सुरु असताना संशयित तीन टेम्पाची तपासणी केली असता या वाहनांमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंदीत असलेली सुगंधी तंबाखु व गुटख्याची हजारो पाकिटे आढळून आली. यानंतर तीनही टेम्पोसह त्यातील सुमारे 1 कोटी 6 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला असुन टेम्पोचालकांसह एकुण 10 जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याविरोधात कासा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top