दिनांक 22 August 2019 वेळ 3:18 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा : शेतकर्‍यांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

वाडा : शेतकर्‍यांचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

एकरी 30 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी

WADA SHETKARI MORCHA

प्रतिनिधी/वाडा, दि. 22 : परतीच्या पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र याकडे प्रशासन व शासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच पालघर जिल्ह्याच्या तालुकानिहाय दुष्काळग्रस्त यादीत वाडा तालुक्याचे नाव वगळण्यात आले आहे. याचा विरोध म्हणून व आपल्या इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज तहसीलदार कार्यालयावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व कुणबी सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेतकर्‍यांना एकरी 30 हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी एकमुखाने करण्यात आली.

या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहिदास पाटील, कुणबी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी केले.

वाडा तालुक्यात सुरवातीपासूनच चांगला पाऊस होता. त्यामुळे पेरणी व भातलावडीची कामे सुरळीत झाली होती. भातपिकेही बहरली होती. मात्र भातपिकांच्या दाणा भरणीसाठी आवश्यक असणार्‍या परतीच्या पावसाने दडी मारल्याने भाताचा दाणा परिपक्व झाला नाही. शेतातील पाणी सुकून जमिनीलाही भेगा पडल्या. त्यामुळे भाताचे दाणे नाहीच पंरतु भाताचा पेंढा सुध्दा हाताला लागला नाही. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासन व शासन लक्ष देत नसल्याने शेतकरी भातपिके पेटवून देत आहेत. या सर्व पार्श्‍वभुमीवर तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज तहसीलदार कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.

WADA SHETKARI MORCHA1दिवाळी सणापूर्वी तालुक्यात दुष्काळ जाहीर न केल्यास पालघर जिल्ह्यात मंत्र्यांना फिरू दिले जाणार नाही तर अधिकार्‍यांना कार्यालयात कोंडून ठेवू, असा गंभीर इशारा काँग्रेसचे नेते विश्वनाथ पाटील यांनी मोर्चात बोलताना दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते पांडुरंग पटारे, हरिभाऊ पाटील, काँग्रेसचे प्रफुल्ल पाटील यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारवर कडाडून टिका केली व तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.

यावेळी काँग्रेसचे दिलीप पाटील, मुस्तफा मेमन, रामदास जाधव, डॉ. विकास पाटील, सुशील पातकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश पवार, कुणबी सेनेचे पराग पष्टे, एकनाथ वेखंडे आदी पदाधिकार्‍यांसह शेकडो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top