दिनांक 18 June 2019 वेळ 6:11 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात पळे बोरीपाडा शाळा प्रथम

तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात पळे बोरीपाडा शाळा प्रथम

VIDYAN PRADARSHAN

डहाणू दि. २१: डॉ. ए. पि. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त डहाणू तालुक्यातील कासा-चारोटी येथील छत्रपतींचा मावळा प्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात १ ते ५ वी च्या गटात जिल्हा परिषदेच्या पळे बोरीपाडा शाळेने पहिला क्रमांक पटकावला. भिसे हायस्कूल दुसऱ्या क्रमांकावर तर ओम इंग्लिश स्कूल तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ६ ते ८ वी गटात भिसे हायस्कूल प्रथम, जिल्हा परिषदेच्या खानिव शाळेने द्वितीय, तर एस. पि. एच. हायस्कूल (बोर्डी) ने तृतीय क्रमांक मिळवला. ९ वी ते १२ वी च्या गटात कोरे विद्यालय (ऊर्से) यांनी पारितोषिके मिळवली.

विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व विज्ञान विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष समशेर मानेशिया व कार्याध्यक्ष हरेश मुकणे यांच्या हस्ते पारितोषिक विजेत्या शाळांना गौरविण्यात आले. यावेळी डहाणू पंचायत समितीचे उपसभापती शैलेश करमोडा, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काशिनाथ चौधरी, सरपंच रघुनाथ गायकवाड, उपसरपंच मनोज जगदेव, पांडुरंग बेलकर, शिक्षण विस्तार अधिकारी संजय वाघ , प्रकाश मरले, विठ्ठल ठाणगे, शैलेश राऊत, केंद्रप्रमुख सुरेश भोये, नंदकुमार लिलका, पुज्य भिसे हायस्कूलचे (कासा) मुख्याध्यापक परदेशी सर, ओम इंग्लिश स्कूलचे संचालक शैलेश राऊत, शिक्षिका प्रतिभा क्षीरसागर-कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

 

comments

About Rajtantra

Scroll To Top