दिनांक 22 August 2019 वेळ 2:55 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » शिक्षणाचे बाजारीकरण व बेरोजगारीविरोधात माकपचे मानवी साखळी आंदोलन

शिक्षणाचे बाजारीकरण व बेरोजगारीविरोधात माकपचे मानवी साखळी आंदोलन

MAKAP SAKHLI AANDOLANप्रतिनिधी/मनोर, दि. 21 : सरकारच्या शिक्षण व रोजगार विरोधी धोरणांचा निषेध म्हणून तसेच सत्ताधारी वर्गाला याची जाणीव करून देण्यासाठी माकपतर्फे आज विविध ठिकाणी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. त्यानुसार मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिल्हार येथे माकपच्या युवा विंग मार्फत मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते.

पोकळ घोषणाबाजी आणि जाहिरात बाजी करणार्‍या केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणांमुळे रोजगार आणि शिक्षण विषयक समस्या जटिल बनत चालल्या आहेत असा आरोप करुन राज्यातील लाखो युवकांना शिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी पक्षाचा झेंडा हातात न घेता महामार्गाच्या कडेला उभे राहून माकपच्या कार्यकर्त्यांनी हे साखळी आंदोलन केले. नोकर भारतावरील बंदी उठवावी, सरकारी विभागातील कंत्राटीकरण रद्द करावे, मनरेगाच्या मजुरीचे दर आणि कामात वाढ करावी, बोगस आदिवासींवर कारवाई करावी, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी करावी, शेतमालाला हमीभाव, पीकविमा योजनेचा लाभ, शासकीय शाळा बंद करण्याचे कारस्थान थांबवा, शाळांमध्ये सोयीसुविधा निर्माण करा आणि शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी माकप तालुका सचिव सुदाम धिंडा, पालघर शहर सचिव बबलू त्रिवेदी, जनवादी महिला संघटना सचिव हिना वनगा, शर्मिला कोती, सदू गुणगुणे, सखाराम पागी, विलास भुयाळ, हरेश वावरे, कमळाकर पावडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

चारोटी नाका येथेही माकपची मानवी  साखळी

MAKAP SAKHLI AANDOLAN-DAHANU

डहाणू दि. 21: वाढती बेरोजगारी व शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आज मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील डहाणू तालुक्यातील चारोटी नाका येथेही साखळी आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकाराने नोकरभरतीवर घातलेली बंदी उठवावी, 3 लाख रिक्त जागा भरण्यात याव्यात, कंत्राटीकरण थांबवावे, रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरु करुन किमान 300 रुपये रोजंदारी देण्यात यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात ज्येष्ठ माकप नेते कॉम्रेड धनगर, रडका कलागडा, विनोद निकोले, चंदु कोम, लहानी दौडा, चंद्रकात घोरखना , कीरन गहला, राजा गहला उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

 

comments

About Rajtantra

Scroll To Top