दिनांक 22 August 2019 वेळ 2:19 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पोलीस हुतात्मा दिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना

पोलीस हुतात्मा दिनानिमित्त शहीद पोलिसांना मानवंदना

POLICE HUTATMA DINराजतंत्र मीडिया/पालघर, दि. 21 : लेह लडाख येथील हॉट स्प्रिंग भागात 20 ऑक्टोबर 1959 रोजी गस्तीकरिता गेलेले दोन कर्मचारी कॅम्पवर न परतल्याने दुसर्‍या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर 1959 रोजी सीआरपीएफ व आय.टी.बी.पी.चे 2 अधिकारी व 20 कर्मचार्‍यांचा समावेश असलेले पथक त्यांचा शोध घेण्याकरिता पाठविण्यात आले होते. यावेळी चीनी सैन्याकडुन या पथकावर बेछुट गोळीबार करण्यात आला होता. त्यात 10 जवान ठार झाले, तर 4 जण जखमी झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ देशभरातील सर्व पोलीस दलातर्फे दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिवस म्हणुन पाळला जातो व या दिनानिमित्ते शहीद पोलिसांना मानवंदना दिली जाते.

POLICE HUTATMA DIN1त्यानुसात आज पालघर पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात 2017-2018 या वर्षात शहीद झालेल्या 414 अधिकारी-कर्मचार्‍यांना पोलीस स्मृती दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमास वसईचे अपर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर, पालघरचे अपर पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण, खासदार राजेंद्र गावीत, आमदार अमित घोडा, पालघरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, जिल्हा न्यायाधीश श्री. डोंगरे, निवासी तहसीलदार केशव तरंगे, पालघरचे नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, पोलीस उपअधिक्षक (गृह) विकास वळवी, राखीव पोलीस निरीक्षक श्री. शिंदे, पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष बन, पालघरचे उपनिरीक्षक श्री. सोनवणे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी-कर्मचारी, सामजिक कार्य करणारे प्रतिष्ठीत व्यक्ती व नागरीक हजर होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top