दिनांक 30 May 2020 वेळ 7:40 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » रोटरी क्लब ऑफ डहाणूच्या शानदार रास गरबा स्पर्धेला सुरुवात

रोटरी क्लब ऑफ डहाणूच्या शानदार रास गरबा स्पर्धेला सुरुवात

डहाणू दि. २०: रोटरी क्लब ऑफ डहाणू आणि कंक्राडी सार्वजनिक उत्कर्ष मंडळातर्फे रास गरब्याच्या स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमासाठी डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे अध्यक्ष राजेश पारेख, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिनेश बारी, कंक्राडी सार्वजनिक उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष भरत बारी, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. लॉयन्स क्लब ऑफ डहाणूच्या नारायण उद्यानावर आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी अतिशय आकर्षक अशी सजावट करण्यात आली असून द्रोण कॅमेराद्वारे केले जाणारे व्हिडीओ चित्रण स्पर्धकांच्या उत्साहात भर घालत होते. प्रथम क्रमांकासाठी ३३ हजार ३३३, द्वितीय क्रमांकासाठी २२ हजार २२२ तर तृतीय क्रमांकासाठी ११ हजार १११ अशी भरघोस पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top