दिनांक 23 February 2018 वेळ 12:27 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » पालघर जिल्हा कबड्डी प्रिमियर लीग स्पर्धेत साहेब किंग संघ ठरला विजेता

पालघर जिल्हा कबड्डी प्रिमियर लीग स्पर्धेत साहेब किंग संघ ठरला विजेता

BOISAR KABBADIप्रतिनिधी :
दि. 13 : शिवतेज क्रीडा मंडळातर्फे आयोजित पालघर जिल्हा कबड्डी प्रिमियर लीग स्पर्धेत बोईसर येथील साहेबकिंग संघाने बाजी मारत प्रथम पारितोषिक पटकावले आहे. बोईसरच्याच शिवमल्हार संघाविरुद्ध झालेल्या अतितटीच्या अंतिम सामन्यात साहेबकिंग संघाने उत्कृष्ट खेळ खेळत चषकावर आपले नाव कोरले. तर डहाणू वॉरियर व शिवशक्ती वॉरियर मनोर या संघांना अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या क्रमांकवर समाधान मानावे लागले.
शिवतेज क्रीडा मंडळाने 8 ते 12 एप्रिल दरम्यान बोईसर येथे या कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले होते. एकुण 16 संघ सहभागी झालेल्या या महासंग्रामामध्ये विजेत्या संघाला तीन लाख रुपये व चषक, तर उपविजेत्या संघाला दोन लाख रुपये व चषक असे पारितोषिक देण्यात आले. तसेच अरविंद देशमुख यांना सर्वोत्तम खेळाडू, योगेश पाटील यांना सर्वोत्कृष्ट पकड, तर जगदीश चौधरी यांना सर्वोत्कृष्ट चढाईचे पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभाला आमदार अमित घोडा, शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनंत तरे, सहसंपर्क प्रमुख केतन पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अनंत तरे म्हणाले की, कबड्डीला वैभव मिळवुन देण्यात कबड्डी महर्षी बुवा साळवी यांचे महत्वाचे योगदान आहे. लाल मातीतील या अस्सल देशी खेळास क्रिकेटप्रमाणे राजाश्रय मिळावा तसेच कबड्डी संघांना व खेळाडूंना प्रायोजक मिळावेत या उद्देशाने अशा स्पर्धांचे आयोजन केले जात असुन आम्हाला ठाणे, मुंबई येथे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करताना क्रीडांगणे व सर्व सोईसुविधा उपलब्ध असताना कठीण जाते. मात्र पालघर बोईसरसारख्या ग्रामीण भागात आयोजकांनी उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल तरे यांनी आयोजकांचे कौतुक केले. तर साहेबकिंग बोईसर संघाचे मालक वैभव संखे यांनी बक्षिस म्हणून मिळालेल्या 3 लाख रुपयांच्या रकमेतून 1 लाख रुपये संघाच्या खेळाडूंना तर 1 लाख रुपये विक्रमगड येथील आदिवासी विभागातील शांतीरतन विद्यालयास देणार असल्याचे घोषित केले. पुढील वर्षी या स्पर्धा मॅटवर खेळवू व मी स्वतः या स्पर्धेतील 15 खेळाडुंना उद्योजकांकडुन प्रयोजकत्व मिळवून देईन, असेही संखे यांनी सांगितले.
कार्यक्रमास शिवतेज क्रीडा मंडळाचे विश्‍वस्त तथा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ, पंचायत समितीचे सभापती रवींद्र पागधरे, उपसभापती मनोज संखे, शहर प्रमुख नीलम संखे, जगदीश धोडी, मिताली राऊत, मुकेश पाटील आदी उपस्थित होते. तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवतेज क्रीडामंडळाचे अध्यक्ष कल्पेश पिंपळे, कार्याध्यक्ष वैभव संखे, उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिव राजेंद्र पाटील व खजिनदार विकास मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुशील सरांनी केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top