दिनांक 30 May 2020 वेळ 8:32 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » आता शाळांमध्ये मिळणार नव्या-कोर्‍या वह्या

आता शाळांमध्ये मिळणार नव्या-कोर्‍या वह्या

>> नमोआनंद स्टार्टअप कंपनीशी राज्य सरकारचा सामंजस्य करार

RAJTANTRA MDEIA/मुंबई दि. 16: शाळेत जाणार्‍या मुलांसाठी आनंदाची बातमी असुन आता या मुलांना रद्दीच्या मोबदल्यात नव्या-कोर्‍या वह्या मिळणार आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि नमोआनंद अपसायकलर्स यांच्यात सामंजस्य करार नुकताच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झाला असून या सामंजस्य करारानुसार विद्यार्थ्यांना शाळेसाठी आवश्यक असणार्‍या वह्या मिळणार आहेत.

SHALA VAHYA

रद्दीच्या मोबदल्यास नव्या कोर्‍या वह्या ही योजना राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका शाळांसह, शासकीय अनुदानित शाळा तसेच निमशासकीय शिक्षण संस्थांमध्ये राबविली जाणार आहे. राज्याचा शालेय शिक्षण विभाग व नमोआनंद अपसायकलर्स या स्टार्टअप कंपनीसोबत शासनाचा सामंजस्य करार झाला असून शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. वंदना कृष्णा आणि नमोआनंद कंपनीचे संचालक आनंद जितेंद्र कोठारी व जितेंद्र स्वरूपचंद कोठारी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

राज्यभरातील सर्व शाळांमधील विद्यार्थी आता आपल्याकडील रद्दी या कंपनीकडे घेऊन आल्यानंतर या विद्यार्थ्यांना या रद्दीच्या मोबदल्यात नव्या कोर्‍या ग्रीन नोटबुक व अन्य पेपर स्टेशनरी मिळणार आहेत. दीड वर्षांपूर्वी ही योजना पुण्यातील महापालिका शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आली होती आणि त्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या योजनें़तर्गत दिल्या जाणार्‍या वह्या 100 टक्के पर्यावरणपूरक असून त्या पुनर्निर्मित कागदापासून (रिसायकल्ड पेपर) पासून बनविलेल्या आहेत.

राज्यातील सर्व शाळांनी ही योजना ऐच्छिक स्वरूपात राबवायची असून त्यासाठी आपल्या संस्थेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांकडून जमा होणारी रद्दी शाळेतील कलेक्शन सेंटरमध्ये जमा होणार आहे. रद्दी कागदांपासून पुनर्निमिर्ती करुन वह्या तयार केल्याने या नव्या क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतानाच कागद आयातीसाठीचे परकीय चलन वाचणार आहे. सध्या आपल्याकडे शालेय वह्या-पुस्तकांची रद्दी जमा करण्याची संघटित यंत्रणा अस्तित्वात नाही. अशी रद्दी या माध्यमातून एकत्र होऊन तिचा सदुपयोग विद्यार्थ्यांसाठीच होणार आहे.

वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे पहिली कुर्‍हाड झाडांवर चालवली जाते. कागदाचा वापर वाढत असल्याने वृक्षतोड देखील अपरिहार्य बनली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे आपल्या वातावरणातील कार्बन-डाय ऑक्साइड वायूचे प्रमाण वाढत असून ही बाब चिंताजनक आहे. या योजनेत नमोआनंद कंपनीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका पातळीवरील शाळांमध्ये रद्दी जमा करण्यासाठी अधिकृत आनंद कलेक्शन सेंटरची उभारणी करण्यात येणार असून त्या ठिकाणी स्वेच्छेने रद्दी जमा करता येईल. रद्दीमध्ये वह्या, पुस्तके, प्रश्‍नपत्रिका किंवा अन्य वापरेली किंवा न वापरलेली पुस्तके आणि कागद तसेच इतर रद्दीचा समावेश असेल.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top