दिनांक 20 February 2020 वेळ 10:47 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ब्लॅकमेल करणार्‍याचा खून केला; आरोपी वाडा पोलिसांच्या जाळ्यात

ब्लॅकमेल करणार्‍याचा खून केला; आरोपी वाडा पोलिसांच्या जाळ्यात

WADA KHUN AAROPI ATKETप्रतिनिधी/वाडा, दि. 15 : आंतरजातीय लग्नाची माहिती लपविण्यासाठी सतत पैशांची मागणी करणार्‍या इसमाचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावायच्या प्रयत्नात असलेला आरोपी वाडा पोलीसांच्या जाळ्यात अडकल्याने खुनाचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मदनलाल सावक (वय 28) असे सदर आरोपीचे नाव असुन यात त्याला मदत करणारा त्याचा भाऊ श्रवण सावक (वय 19) यालाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मदनलाल सावक व श्रवण सावक हे मूळचे राजस्थानमधील गडबोल येथील असून त्यांचे वसई पश्चिमेतील माणिकपूर भागातील अनंत नगर येथे मिठाईचे दुकान आहे. यातील मदनलाल याने गुपचूप दुसरा आंतरजातीय विवाह केला होता ज्याची माहिती त्याच्या गावाकडील नारायणलाल चंपालाल सेवक यास कळाली होती. मदनलालच्या या विवाहाची माहिती त्याच्या घरच्या मंडळींपासुन व गावातील नातेवाईकांपासुन लपवून ठेवण्यासाठी नारायणलाल सतत त्याच्याकडून पैसे उकळत असायचा.

नेहमीप्रमाणे काल, रविवारी पहाटे 5 च्या सुमारास नारायणलाल मदनलालकडे आला व पैशांची मागणी करू लागला. मात्र सध्या पैसे नाहीत व्यवस्था करून देतो, असे मदनलालने त्याला सांगितले. यावरुन सकाळी 10.30 च्या सुमारास या दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी संतापलेल्या मदनलालने रस्सीने गळा आवळून नारायणलालला ठार केले. हत्येनंतर मदनलालने आपला भाऊ श्रवणला घरी बोलावून बाजारातून बॅग आणली व त्यात नारायणलालचे प्रेत भरले. त्यानंतर एक गाडी भाड्याने घेऊन तिच्या डिक्कीत बॅग ठेऊन वाडा मार्गे जव्हारकडे निघाले. याच वेळी वाघोटे येथील टोल नाक्यावर गस्त घालणार्‍या गुन्हे प्रतिबंधक पथकाने गाडीला अडवून चौकशी करीत असताना गाडीत रॉकेलच्या बाटल्या, रस्सी व काही हत्यारे असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी गाडीची डिक्की तपासली असता बॅगमध्ये भरलेले प्रेत पोलिसांना आढळून आले.

पोलीसांनी तात्काळ यातील दोन्ही आरोपींना अटक करुन वाहन जप्त केले आहे तसेच आरोपींवर वाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास माणिकपूर पोलीस करतील, अशी माहिती वाडा पोलीसांनी दिली.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

 

 

comments

About Rajtantra

Scroll To Top