मुलगा व पत्नी यांच्या उपचारासाठी देवा भट्ट यांचे आर्थिक मदतीचे आवाहन

0
5

img-20181014-wa00082754272517746537623.jpgराजतंत्र मिडीया/डहाणू दि. १४: अपघातात गंभीर जखमी झालेला मुलगा करण आणि दोन्ही किडण्या खराब झाल्याने डायलॅसिस वर असलेली पत्नी अंजना यांच्या उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर गेला असल्याने दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदत करावी असे आवाहन डहाणूतील देवा (देवेंद्र) भट्ट यांनी केले आहे.

गोवा येथील हॉलीडे इन चा व्यवस्थापक असलेल्या २६ वर्षीय करणचा महिन्याभरापूर्वी अपघात होऊन त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. करणच्या डोक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असली तरी त्याच्या डोक्याच्या कवटीच्या हाडाला हानी झाल्याने तेथे कृत्रिम हाड बसविले जाणार आहे. पुढील टप्प्याच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सुधारणा होईपर्यंत त्याची घरीच सुश्रुषा केली जात आहे.

त्यातच भर म्हणजे देवा यांच्या पत्नी अंजना यांना मधुमेहाने ग्रासले असून त्यांच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या आहेत. त्या किडणी दात्याच्या प्रतीक्षेत आहेत. अंजना यांना आठवड्यातून २ वेळा डायलॅसिस करावे लागत आहे. एकाच वेळी मुलगा आणि पत्नी यांच्या उपचाराचा खर्च पेलणे व्यवसायाने वाहन चालक असलेल्या देवा यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे दानशूर लोकांनी यथाशक्ती आर्थिक सहाय्य करावे असे आवाहन देवा यांनी केले आहे. त्यांच्याशी 9112026647 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

Print Friendly, PDF & Email

comments