दिनांक 20 June 2019 वेळ 5:44 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » अखेर कुणालची जगण्यासाठीची लढाई संपली; काल बॉंबे हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

अखेर कुणालची जगण्यासाठीची लढाई संपली; काल बॉंबे हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

KRUNAL MADATराजतंत्र मिडीया/डहाणू दि. १३ ऑक्टोबर: २९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने डोक्याला जबर इजा झालेल्या कुणाल प्रवीण मळेकर या २१ वर्षीय युवकाचा जगण्यासाठीचा संघर्ष अखेर संपला आहे. काल (१२ ऑक्टोबर) सायंकाळी ६.४५ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या लढाईत पाठीशी तन, मन आणि धनाने उभ्या राहिलेल्या डहाणूकरांचे प्रवीण मळेकर यांनी आभार मानले आहेत.

वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये (मीरा रोड) त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो आजतागायत बेशुद्धावस्थेतच होता. त्याच्या मेंदुची कवटी निरीक्षणासाठी उघडी ठेवूनच त्याच्यावर उपचार चालू होते. कवटी बसविण्यात आल्यानंतर पुढील टप्प्यांचे उपचार चालू झाले होते. कुणालचे वडील सेवानिवृत्त असल्याने त्यांच्या आटोक्यात हे उपचार नव्हते. त्यांनी दानशूर व्यक्ती आणि संस्थांना मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोकांनी वेळोवेळी भरघोस मदतही केली होती. ४ ऑक्टोबर रोजी डहाणूतील महिलांनी कुणाल साठी मदतफेरी काढली होती. या मदतफेरीत भरघोस मदतही गोळा झाली. लोकांनी कुणालच्या आयुष्यासाठी प्रार्थनाही केल्या. तथापी कुणालने उपचाराला प्रतिसाद दिला नाही.

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

APP DOWNLOAD

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top