दिनांक 18 June 2019 वेळ 6:17 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाड्यात 2 लाखांचा गुटखा पकडला

वाड्यात 2 लाखांचा गुटखा पकडला

>> दोघांना अटक, वाडा पोलिसांची कारवाई

WADA GUTKHA

प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : शहरातील खण्डेश्वरी नाका येथे पोलीसांनी अवैध गुटख्याची वाहतूक करणार्‍या टॅम्पोवर कारवाई करत 2 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे.

वाडा-मनोर रस्त्यावर अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती वाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. बी. बोराडे यांना मिळाली होती. त्यानुसार काल, गुरुवारी संध्याकाळी वाडा पोलीसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना संशयावरुन एम.एच. 04/जी.आर.4454 या क्रमांकाच्या टाटा टॅम्पोला अडवून तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे दोन लाख रुपये किंमतीचा गुटखा आढळुन आला. पोलीसांनी गुटखा व टॅम्पो असा सुमारे पावणेचार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन वाड्यातील संतोष रतीलाल भानुशाली (वय 47) व वसई तालुक्यातील रियाज अब्दुल गणी शेख (वय 37) यांना ताब्यात घेतले आहे. तसेच या दोघांवर वाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 188, अन्न व सुरक्षा मानके 26 (1),(5), 30(2)(अ), 3(1) (झेड.झेड.) आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस उपनिरीक्षक सुशील भोसले अधिक तपास करीत आहेत.

    • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
    • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
    • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

    DOWNLOAD APP

    ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top