दिनांक 11 December 2018 वेळ 12:49 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » सफाळे-वरई रस्त्यावर दुचाकींच्या अपघातात तरुण ठार

सफाळे-वरई रस्त्यावर दुचाकींच्या अपघातात तरुण ठार

SAFALE ACCIDENTराजतंत्र मीडिया/सफाळे, दि. 11 : सफाळे-वरई रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अक्षय भरत पाटील असे सदर तरुणाचे नाव असुन तांदुळवाडी घाटात हा अपघात घडला.

गिराळे गावातील रहिवासी असलेला अक्षय बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सफाळ्याहून घरी परतत होता. मात्र सफाळे-वरई रस्त्यावरील तांदुळवाडी घाटातील नागमोडी वळणावर अक्षयच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीची जोरदार टक्कर बसली. या धडकेनंतर अक्षय बसवर जाऊन आदळल्याने त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली व त्याचा जागीच मृत्यू झाला.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP 

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

 

comments

About Rajtantra

Scroll To Top