दिनांक 10 December 2018 वेळ 10:47 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू वनविभागातर्फे वन्यजीव सप्ताह साजरा

डहाणू वनविभागातर्फे वन्यजीव सप्ताह साजरा

img-20181006-wa00084281392510416134297.jpg

राजतंत्र मिडीया

डहाणू दिनांक ६: वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, त्यासाठी पुरेशी जनजागृती व्हावी या उद्देशाने डहाणू वनविभागातर्फे १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये व मुक्त गटात निबंध व चित्रकला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या. यशस्वी स्पर्धकांना उप वनसंरक्षक श्री भिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र व बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वन्यजीव वैद्यकीय चिकित्सक दिनेश व्हीनेरकर उपस्थित होते. यावेळी मानद वन्यजीव रक्षक धवल कंसारा, वनक्षेत्रपाल राहुल मराठे, श्रीमती निकट उपस्थित होते. कार्यक्रमात कंसारा व व्हीनेरकर यांनी उपस्थितांना वन्यजीव संरक्षण व संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले. वन्यजीव संरक्षणाचे कार्य करणाऱ्या सदस्यांचा यावेळी मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनरक्षक श्रीमती भाविका शिंदे तर आभार प्रदर्शन वनपाल राहुल नाईक यांनी केले.

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

APP DOWNLOAD

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top