दिनांक 17 February 2020 वेळ 12:50 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » महावितरणच्या बिलांचे विलंबाने वाटप

महावितरणच्या बिलांचे विलंबाने वाटप

>> धनंजय गोखले यांची तक्रार

DAHANU VEEJ BILLराजतंत्र मीडिया/डहाणू दि. २ : डहाणू विभागातील महावितरणची विज बिले ग्राहकांपर्यंत विलंबाने पोहोचत असून त्यामुळे ग्राहकांना बिलातील सवलतीपासून वंचीत रहावे लागत असे. जागृत विज ग्राहक धनंजय गोखले यांनी याबाबत तक्रार केली आहे. कधीकधी ही बिले भरणा करण्यासाठीची अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर मिळत असल्याने ग्राहकांना विनाकारण विलंब शुल्क भरावे लागत आहे. गोखले यांनी याबाबत ग्राहकसेवा केंद्राच्या टोल फ्री क्रमांक 1800-102-3535 वर देखील संपर्क साधला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. उप कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात गेले असता त्यांना बिले वाटणाऱ्या ठेकेदाराशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. ठेकेदाराशी संपर्क साधला असता महावितरण कडूनच विलंबाने बिले मिळाल्याचा ठेकेदाराचा दावा आहे. याबाबत गोखले यांनी लेखी तक्रार केली आहे.

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

comments

About Rajtantra

Scroll To Top