दिनांक 17 January 2020 वेळ 10:49 PM
Breaking News
You are here: Home » Uncategorized » कुणालचा जगण्यासाठीचा संघर्ष चालूच, वडीलांचे मदतीचे आवाहन

कुणालचा जगण्यासाठीचा संघर्ष चालूच, वडीलांचे मदतीचे आवाहन

KRUNAL MADAT1

राजतंत्र मिडीया/डहाणू दि. २ ऑक्टोबर: २९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने डोक्याला जबर इजा होऊन रुग्णालयात दाखल असलेल्या कुणाल प्रवीण मळेकर या २१ वर्षीय युवकाचा दिड वर्षानंतरही जगण्यासाठीचा संघर्ष चालूच आहे. वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये (मीरा रोड) त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतरही तो आजतागायत बेशुद्धावस्थेतच आहे. त्याच्या मेंदुची कवटी निरीक्षणासाठी उघडी ठेवूनच त्याच्यावर उपचार चालू होते. आता कवटी बसविण्यात आल्यानंतर पुढील टप्प्यांचे उपचार चालू आहेत. कुणालचे वडील सेवानिवृत्त असून त्यांच्या आटोक्यात हे उपचार नसल्यामुळे दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या जोरावरच ही लढाई सुरु आहे. त्याच्या उपचारासाठी याआधी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोकांनी वेळोवेळी भरघोस मदतही केलेली आहे. आता शेवटच्या टप्प्यातील लढाईसाठी लोकांनी पुन्हा एकदा मदतीचा हात द्यावा असे आवाहन त्याचे वडील प्रवीण मळेकर यांनी केले आहे. त्यांच्याशी मोबाईल क्रमांक 9975264162 किंवा 8007960074 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

APP DOWNLOAD

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top