दिनांक 17 July 2019 वेळ 4:28 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा : दुचाकी अपघातात 1 ठार

वाडा : दुचाकी अपघातात 1 ठार

प्रतिनिधी/वाडा, दि. 30 : भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावर काल शनिवारी दुचाकीला झालेल्या अपघातात एका इसमाचा मृत्यू झाला असुन प्रभाकर पाटील असे सदर इसमाचे नाव आहे.

शनिवार रात्री आठ वाजताच्या सुमारास महामार्गावरील पाहुनीपाडा ते नेहरोली दरम्यान हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार प्रभाकर पाटील यांच्या दुचाकीने त्यांच्या पुढे चाललेल्या अज्ञात वाहनाला धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ. घुगे यांनी त्यांना मृत घोषित केले. तालुक्यातील गुंज काठी येथील रहिवासी असलेले प्रभाकर पाटील हे अल्ट्रा टेक कंपनीमध्ये कार्यरत होते.

दरम्यान, महामार्गावर एकाच आठवड्यात झालेल्या वेगवेगळ्या तीन अपघातात तिघांचे प्राण गेले आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top