दिनांक 22 September 2019 वेळ 5:20 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » पोषण अभियानांतर्गत उत्कृष्ट अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका व आशा स्वयंसेविकांचा सन्मान

पोषण अभियानांतर्गत उत्कृष्ट अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका व आशा स्वयंसेविकांचा सन्मान

POSHAN ABHIYAN SATKARराजतंत्र मीडिया/पालघर, दि. 27 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या पोषण अभियानांतर्गत उत्कृष्ट अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्यसेविका व आशा स्वयंसेविकांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. बालकांच्या बौद्धिक, शारिरिक आणि सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांच्या समन्वयाने राबविण्यात येत असलेले पोषण अभियान जिल्ह्यात मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्यसेविका व आशा स्वयंसेविकांचे अभिनंदन असे उद्गार जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती धनश्री चौधरी यांनी याप्रसंगी काढले. तसेच जिल्ह्यात टाटा ट्रस्ट, इम्पॅक्ट इंडिया अशा स्वयंसेवी संस्थांचे कुपोषण निर्मुलनाच्या कार्यात मोठे योगदान आहे आणि त्यांच्या सहकार्याने येत्या काळात जिल्हा कुपोषण मुक्त घोषित होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमामध्ये कार्यप्रणाली अंतर्गत कासा प्रकल्पातून संगीता भोईर, राजेश्री बसवत आणि एस. आर. गोसावी; तलासरी प्रकल्पातून संगीता बोबडे, उषा चौधरी आणि पी. बी. कांबळे; वसई 1 प्रकल्पातून विजया मेहेर, विद्या वैती आणि विद्या शिंदे; वसई 2 प्रकल्पातून सुलभ जाधव, गौरी कामडी आणि सुरेखा चव्हाण; वाडा प्रकल्पातून संगीता रोज, सुवर्णा रोज आणि जिजा सातवी; वाडा 2 प्रकल्पातून मनीषा खंडागळे, सुधा सातवी आणि लता गाडणे; डहाणू प्रकल्पातून गुलाब गवळी, श्रेया खरपडे आणि शोभा खरपडे; जव्हार प्रकल्पातून प्रियांका दिघा, अमिता बोरसे, ललिता फाडवळे; जव्हार 2 प्रकल्पातून नाजु बोरसे, अलका घाटाळ, एम. मावले; विक्रमगड प्रकल्पातून सुमन राऊत, उषा दिवा, सिंधू चौधरी; पालघर प्रकल्पातून जिया वडे, भारती घरत, विद्या पाटील; मनोर प्रकल्पातून मेघा पवार, संगीता वावरे, अलका वाघ तर मोखाडा प्रकल्पातून भागीरथी जाधव, मनिषा पाटील व रेणुका पदिकार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी बालरोगतज्ञ डॉ. रुपाल दलाल, इम्पॅक्ट इंडियाचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. अंबादास आढाव, डॉ. अभिजित खंदारे व मनोर बाल विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. नवनाथ घनतोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शासनाच्या राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य पोषण मिशनच्या संचालक सुप्रभा अग्रवाल, टाटा ट्रस्टचे पोषण तज्ञ टी. मधुसूदन राव, पालघर पंचायत समितीच्या सभापती मनीषा पिंपळे, महिला बाल कल्याण अधिकारी राजेंद्र पाटील, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. टाटा ट्रस्टचे डॉ. रोहंत प्रधान यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top