दिनांक 22 September 2019 वेळ 4:53 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » सातपाटी पोलीसांकडुन गावठी दारुचा अड्डा उद्ध्वस्त

सातपाटी पोलीसांकडुन गावठी दारुचा अड्डा उद्ध्वस्त

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यूज नेटवर्क
पालघर, दि. 26 : काल, मंगळवारी सातपाटी पोलीसांनी नांदगाव मराळे येथील झुडपात उभारण्यात आलेल्या झोपड्यावर छापा मारुन गावठी हातभट्टीची दारु व ही दारु बनविण्यासाठी लागणारी साधने असा एकुण 3 लाख 59 हजार 550 रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. तसेच हा अड्डा चालवणार्‍या इसमाविरोधात सातपाटी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (क)(फ)(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे. सातपाटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकुर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कासा व वालीव भागात छापा मारुन 35 हजार 823 रुपयांचा मुद्देमाल जप्त
जिल्ह्यातील विविध भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलीसांची छापेमारी सुरु असताना कासा व वालीव पोलीसांनी त्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध गावठी दारुच्या अड्ड्यांवर छापा मारुन एकुण 35 हजार 823 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी दोन जणांविरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सरु आहे.

वसईत पोलीसांकडून लाखो रुपयांचा गुटखा जप्त
वसई, दि. 26 : वालीव पोलीसांनी आज, बुधवारी गुटख्याची अवैद्यरित्या वाहतुक करणार्‍या टेम्पोवर कारवाई करत टेम्पोसह 11 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेला गुटखा आणला जाणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी एम.एच.04/एच.डी.9572 या क्रमांकाच्या संशयित टेम्पोला अडवून पाहणी केली असता त्यात 75 गोणी गुटखा आढळून आला. याप्रकरणी पोलीसांनी टेम्पोचालकाला ताब्यात घेतले असुन अधिक तपास सुरु आहे.

वसईत दोन जुगारींना अटक
गणेशोत्सव काळात पोलीसांकडून सुरु असलेली जुगारींवरील कारवाई अद्यापही सुरु असुन काल, मंगळवारी सायंकाळी वसई तालुक्यातील पापडी-नायगाव रोडवरील अंबीका बार रेस्टॉरंटच्या पाठीमागील मोकळ्या जागेत जुगार खेळणार्‍या दोन जणांना पोलीसांनी अटक केली आहे. या दोघांकडुन दिड हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असुन अधिक तपास सुरु आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top