डहाणूत दोन अल्पवयीन मुलींची आत्महत्या

0
352

राजतंत्र मीडिया :

डहाणू, दि. 17 : येथील आशागड पोलीस चौकी हद्दीत येणार्‍या आंबेसरी या जंगलपट्टी भागातील दोन अल्पवयीन आदिवासी मुलींनी रात्रीच्या सुमारास एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असुन या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

आशागड – धुंदलवाडी राज्यमार्गावरील आंबेसरी या बहूसंख्य आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावातील सवू उंबरसाडा व साधना उंबरसाडा या दोन अल्पवयीन असलेल्या चुलत बहिणींनी घरापासून 2 किमी अंतरावर असलेल्या जंगलात एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच डहाणू पोलीसांनी घटनास्थळी भेट देत मृत मुलींच्या आई वडिलांचा जवाब नोंदवला व दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या मुलींच्या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट नसून चौकशी झाल्यानंतरच ते कळू शकेल अशी माहिती डहाणू पोलीसांनी दिली आहे. दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उप जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments