दिनांक 22 September 2019 वेळ 4:52 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना

LOGO-4-Onlineपालघर, दि. १५ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना १०० टक्के अनुदानावर (मोफत) शेतजमीन उपलब्ध करुन देण्याकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत असुन इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अफ्रिन अपार्टमेंट, बी व्हिंग, पहिला मजला, रुम नं. १०६, १०७, १०८, रेल्वे फाटकाजवळ, नवली, पालघर (पू.) येथे संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आले आहेे.

लाभाचे स्वरूप :
सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या दारिद्य्र रेषेखालील भूमीहिन कुटूंबाला खालीलप्रमाणे जमीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
१) ४ एकर कोरडवाहू (जिरायत) जमीन-किंमत कमाल रुपये ५ लक्ष प्रती एकर किंवा
२) २ एकर ओलीताखालील (बागायत) जमीन, किंमत कमाल रुपये 8 लक्ष प्रती एकर

लाभार्थी निवडीचे निकष :-
१) लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा.
२) लाभार्थी दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन असावा.
3) लाभार्थ्यांचे वय किमान १८ वर्ष व कमाल वय ६० वर्ष असावे.

निवडीचा प्राधान्यक्रम :-
1) दारिद्य्र रेषेखालील भूमीहीन परितक्त्या स्त्रिया.
2) दारिद्य्र रेषेखालील भूमीहीन विधवा स्त्रिया.
३) अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचार ग्रस्त.
दरम्यान, सदर योजनेसाठी जमीन देण्यासाठी इच्छुक जमीन मालकांनी शेतजमिनीवर कोणताही बोजा, कर्ज, थकबाकी नसल्याच्या प्रमाणपत्रासह १४ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयात नमूद दरानुसार आपला प्रस्ताव वर नमूद पत्यावर सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top