दिनांक 11 December 2018 वेळ 6:42 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वसईत १० लाखांचा गुटखा जप्त

वसईत १० लाखांचा गुटखा जप्त

VASAI GUTKHAदि. १६ : वसई पोलीसांनी सुसुनवघर गावातील नाक्यावर उभ्या असलेला एक टॅम्पो तसेच त्याच्या शेजारी असलेल्या गाळ्यावर छापा मारुन १० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. १४ सप्टेंबर रोजी गस्तीवर असलेल्या पोलीसांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास पोलीसांनी येथे छापा टाकला असता महेंद्रा जिनीयो गाडीत १७ गोणी तसेच गाडीच्या बाजुला असलेल्या गाळ्यामध्ये सुमारे ३२ गोणी असा एकुण १० लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. दरम्यान, पोलीसांनी गुटख्यासह टेम्पो जप्त केला असुन अन्न व औषध प्रसाधने विभागाकडे प्रकरण वर्ग केले आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top