कर्णबधिर शाळेचे कार्य खूपच कौतिकास्पद! – मोहनभाई पटेल

0
20

राजतंत्र न्यूज नेटवर्क
डहाणू दि. ९: येथील ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समिती संचलित कर्णबधिर विद्यालयाचे कार्य खूपच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांसाठी अतिशय अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात असल्याचे पाहुन समाधान वाटल्याचे प्रशंसोद्गार मुंबईचे माजी नगरपाल तथा ज्येष्ठ समाजसेवक मोहनभाई पटेल यांनी डहाणू येथे बोलताना काढले. मुक बधिर बाल विकास केंद्राच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ” जिद्द स्वावलंबनाची ” या माहितीपटाचे पटेल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समाजाने अशा संस्थांच्या पाठीशी ताकदीने उभे रहावे अशी अपेक्षा देखील पटेल यांनी व्यक्त केली. व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मालती रमेश चूरी, सचिव सौ.मधुमती राऊत व मुख्याध्यापिका सौ.शोभा स. चव्हाण उपस्थित होत्या.

पद्मश्री अनुताई वाघ यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या संस्थेतर्फे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत १९८० पासून कर्णबधिर विद्यालय चालविले जात असून संस्थेला १ ली ते ६ वि पर्यंत शासकीय अनुदान आहे. मात्र संस्था त्यानंतरचे विद्यार्थ्यांचे शिक्षण परिसरातील दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या बळावर देत असल्याची माहिती संस्थेच्या सचिव सौ. मधुमती यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. अध्यक्षा श्रीमती चुरी यांनी संस्थेच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेऊन त्यासाठी प्रयत्नशील सर्वांचे कौतुक केले. कार्यक्रमात विशेष शिक्षकांना अध्यक्षांच्या हस्ते गौरविण्यात आले.

डहाणूतील अभिजीत देशपांडे यांनी माहितीपट बनविला असून त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, महरंद अनासपुरे व मकरंद देशपांडे यांचे शुभेच्छा संदेश देखील आहेत. दैनिक राजतंत्रचे App आजच Download करा आणि आपल्या मोबाईल वर बातम्या मिळवा!

Print Friendly, PDF & Email

comments