दिनांक 26 May 2020 वेळ 7:48 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड

वेश्याव्यवसायासाठी बांगलादेशातून मुलींची तस्करी करणारा आरोपी गजाआड

lcbराजतंत्र न्युज नेटवर्क
वसई, दि. ७ : गरीब बांगलादेशी मुलींना नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवून त्यांना भारतात आणून वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या आरोपीला अटक करण्यात अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटला यश आले आहे. मोहम्मद सैद्दल मुस्लिम शेख (वय २८) असे सदर आरोपीचे नाव असुन त्याने तब्ब्ल ५०० मुलींना फसवणूक करून त्यांना वेश्याव्यवसायात अडकविल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या वर्षी पोलिसांनी येथील एका वेश्याव्यवसायावर छापा मारून चार मुलींची सऊतका केली होती, या चार मुली बांगलादेशी असल्याचे व त्यांची फसवणूक करून या व्यवसायात ढकलल्याचे समोर आले आहे. तेव्हापासून बांगलादेशी मुलींना फसवून भारतात आणणाऱ्या टोळीचा पोलीस शोध घेत होते. पोलिसांच्या तपासात मोहम्मद सैदुल मुस्लिम शेख हा या टोळीचा म्होरका असल्याचे स्पष्ट झाले होते. तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोशनराजतिलक
यांनीही या टोळीचा शोध सुरु केला होता. अखेर पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटचे प्रमुख जितेंद्र बनकोटी व हितेंद्र विचारे यांच्या पथकाने मोहम्मद सैदुलला काल, गुरुवारी अटक केली, सैदुलया हा मूळचा बांगला देशातील नोडिया जिल्ह्याचा रहिवासी असुन सध्यां डोंबिवली येथे व वास्तव्यास होता. वेश्याव्यवसायासोबत तो मुंबई व राहपरिसरात बांगालादेशी नागरिकांचे पैसे हवालामार्फत बांगलादेशात पाठवत असे. त्याच्यावर पालघर व ठाणे जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top