दिनांक 17 February 2020 वेळ 1:21 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वडवली दरोडा प्रकरणातील चार आरोपी जेरबंद ; वाडा पोलिसांची अवघ्या सव्वा महिन्यात कारवाई

वडवली दरोडा प्रकरणातील चार आरोपी जेरबंद ; वाडा पोलिसांची अवघ्या सव्वा महिन्यात कारवाई

IMG-20180907-WA0046प्रतिनिधी
वाडा, दि. ७ : तालुक्यातील वडवली येथील माजी उपजिल्हाधिकारी नामदेव जाधव यांच्या घरावर १७ जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान दरोडा पडला होता. या दरोड्यात कुठलाही पुरवा उपलब्ध नसतानाही अवघ्या सव्वा महिन्यात पोलिसांनी अगदी नियोजनबद्ध कारवाई करत आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. या कारवाईमुळे वाडा पोलसांचे कौतूक केले जात आहे.

या दरोड्यात दरोडेखोरांनी पिस्तूल व चॉपरचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोकड असा ४ लाख ४० हजारांच्या ऐवज लंपास केला होता. विशेष म्हणजे या दरोड्यात कुठलाही पुरावा दरोडेखोरांनी मागे ठेवला नव्हता त्यामुळे पोलीसांपुढे तपासाचे मोठे आव्हान होते.

असे असताना वाडा पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी तपास हाती घेऊन एका स्थानिक संशयीत आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून गुह्याचा उलगडा केला. अटक आरोपीना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश जाधव यांच्या घरात दीड कोटींची रोकड व एक किलो सोने असल्याची माहिती परप्रांतीय दरोडेखोरांना मिळाली होती. त्यानंतर मुख्य आरोपी धर्मेंद्र सिंह (३५) याने नियोजन करून राजू उर्फ सफेद खान (२६), मलखार चंद्रीदासिक (२६), याकूब खान (२८) तसेच इतर ३ साथीदारांसह सशस्त्र दरोडा टाकून ४ लाख ४० हजारांच्या येवज लुटून नेला होता. यापैकी २ लाख ९२ हजारांचा ऐवज, एक गावठी कट्टा, ३ जीवंत काडतुस, व आरोपींकडून एक गुह्यात वापरण्यात आलेली मोटरसाइकल जप्त करण्यात आली आहे. तर सह धर्मेंद्र सिंह, राजू उर्फ सफेद खान,मलखार चंद्रीदासिक,याकूब खान या चौघा आरोपींना वाडा पोलिसांच्या एका पथकाने उत्तर प्रदेश येथे जाऊन अटक केले आहे. आणखी तीन आरोपी फरारी असून पोलीस कसुन शोध घेत आहेत.

या तपास पथकात पोलिस उपनिरीक्षक भोसले,प्रशांत सुबनावळ, गोंजारी पोलिस नाईक माळी,चन्नेच,पवार, कोकणे यांचा समावेश होता. या दरोड्याचा तपास अवघ्या सव्वा महिन्यात उघडकीस आणल्यामुळे वाडा पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

दरम्यान धर्मेंद्रसिंह हा उत्तर प्रदेश मधील राहिवाशी असून चोरीच्या आरोपामधे उत्तर प्रदेश मधे शिक्षा भोगत असताना विशेष सवलत(पॅरोलवर)घेऊन बाहेर आला होता व त्यानंतर पलायन करून वाडा तालुक्यातील एका कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करून आजुबाजूच्या परिसराची टेहळणी करत असे. फिर्यादी जाधव यांच्या घरी दीड कोटींचा मुद्देमाल असल्याची माहिती आरोपींना मिळाल्याने हा दरोडा पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या बाबत अधिक तपास सुरू असून लवकरच फरारी आरोपींना अटक केली जाईल व या आरोपींनी इतरही काही गुन्हे केले असल्यास उघड होतील अशी माहिती पोलिस निरीक्षक सुदाम शिंदे यांनी दिली

comments

About Rajtantra

Scroll To Top