कृषी तंत्रज्ञान प्रचार व प्रसारातील बहुमोल योगदानाबद्दल कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रास सर्वोत्तम संस्था पुरस्कार

0
12

LOGO-4-Onlineडहाणू, दि. 06 : गेल्या 42 वर्षांपासून ठाणे व पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या विशेषतः आदिवासी शेतकरी बांधवाच्या उन्नतीकरीता कृषी विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करुन त्याद्वारे येथील शेतकर्‍यांचे शेती उत्पादन वाढण्यास व त्यांच्या राहणीमानाचा स्तर उंचावण्यास मोठा हातभार लावणार्‍या कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्रास या बहुमोल योगदानाबद्दल सन 2018 या वर्षीचा प्रतिष्ठेचा असा सर्वोत्तम संस्था पुरस्कार प्राप्त झाला आहे. 

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मुंबईतील परेल येथे शिक्षक दिन तसेच आर.एम्. भट हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या एका शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ विलास जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी व्यासपीठावर गोखले एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन डॉ. आर. जे. गुजराथी, सचिव सर डॉ. मो. स. गोसावी, गुरूदक्षिणा माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा प्रतिमा जोशी, विभागीय सचिव डॉ. सुहासिनी संत, डॉ. राम कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळण्यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्रिं. एस्. बी. पंडित, विभागीय सचिव प्रिं. प्रभाकर राऊत यांच्यासह डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे तसेच आयसीआरचे अटारी पुणे येथील संचालक डॉ. लखन सिंग यांचे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले, अशी माहिती कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने एका प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जा असलेली गोखले एज्युकेशन सोसायटी या नामांकित संस्थेच्या मार्फत शिक्षण व ग्रामीण विकास क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. सोसायटीच्या 140 केंद्रामधून कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्राची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्राचे प्रमुख विलास जाधव तसेच केंद्रातील सर्व शास्त्रज्ञ व कर्मचार्‍यांंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments