वसईत गावठी दारुचा अड्डा उद्ध्वस्त पावणे पाच लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

0
18

वसई, दिVASAI GAVTHI DARU. 06 : येथील वालीव पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशिररित्या सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारुच्या अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकून 32 लिटर गावठी दारुसह एकुण 4 लाख 83 हजार 500 रुपये किंमतीचा दारु बनविण्यासाठी लागणारा मुद्देमाल नष्ट केला आहे.

वालीव पोलीसांना काल, बुधवारी मालजीपाडा नागोबा मंदिराच्या पाठीमागे खाडी किनारी दलदलीत गावठी हातभट्टीची दारु तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी दोन पंचासह दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास याठिकाणी छापा टाकला असता खाडी किनारी दलदल व झाडी-झुडपामध्ये एक आरोपी हातभट्टी लावुन दारु गाळप करीत असल्याचे आढळून आले. यानंतर पोलीसांनी छापा टाकुन 32 लिटर तयार गावठी दारु व दारु तयार करण्यासाठी लागणारे सुमारे 4 लाख 80 हजार रुपये किंमतीचे साहित्य जागीच नष्ट केले. याप्रकरणी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

Print Friendly, PDF & Email

comments