दिनांक 21 February 2020 वेळ 12:43 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » सिंधूताई अंबिकेंचा वारली भाषेतील साहित्य संग्रह प्रकाशित

सिंधूताई अंबिकेंचा वारली भाषेतील साहित्य संग्रह प्रकाशित

RAJTANTRA MEDIA

कोसबाड, दि. ५: सिंधूताईंकडे असलेला अमुल्य ठेवा जर डॉक्यूमेंटेशन झाले नसते तर काळाच्या पडद्याआड जाऊ शकला असता. ते आपल्याला परवडण्यासारखे नाही. आणि म्हणून आणखी कुणाकडे जर असे मौलिक ठेवे असतील तर ते प्रसिद्ध करण्यासाठी आपण निश्चित पुढाकार घेऊ अशी आश्वस्त ग्वाही ज्येष्ठ शिक्षणप्रेमी समाजसेवक शाम वाघ यांनी पद्मभूषण ताराबाई मोडक विद्यानगरी (कोसबाड – डहाणू ) येथे बोलताना दिली. बालशिक्षणतज्ञ व लेखिका सिंधूताई अंबिके यांनी संग्रहित केलेल्या वारली भाषेतील लोककथा, लोकगीते आणि लोकनृत्ये, उखाणे यांची रेलचेल असलेल्या ” गुंजांची माला ” या साहित्य संग्रहाचे प्रकाशन शाम वाघ यांच्या हस्ते पद्मभूषण ताराबाई मोडक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या शानदार कार्यक्रमात संपन्न झाले. ” गुंजांची माला ” च्या निमित्ताने वारली भाषेच्या अभ्यासकांना एक उपयुक्त पुस्तक उपलब्ध झाल्याचे प्रतिपादन शाम वाघ यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रगती प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनंदाताई पटवर्धन उपस्थित होत्या.
दैनिक राजतंत्रचे App आजच Download करा आणि आपल्या मोबाईल वर बातम्या मिळवा!

सिंधूताई यांनी १९५९ ते १९९२ या कालावधीत नूतन बाल शिक्षण संघाच्या कोसबाड येथील ग्राम बाल शिक्षा केंद्रात ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापनाचे कार्य केले. आजही त्या बाल शिक्षणातील प्रयोग करीत असतात. त्यांचा आदिवासींची भाषा, चालीरीती, गीते यांचा अभ्यास असून अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे ” गुंजाची माला ” च्या निमित्ताने ८ वे पुस्तक प्रकाशित झाले आहे. आपले मनोगत व्यक्त करताना सिंधूताईंनी अनुताईंच्या सानिध्यातील अनेक क्षण उलगडून सांगितले. त्यांनी अनुताईंचे भाचे असलेल्या शाम वाघ यांच्याविषयी पुस्तक प्रकाशनात घेतलेल्या पुढाकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हे पुस्तक सिंधूताईंनी ताराबाईंना अर्पण केले आहे.
दैनिक राजतंत्रचे App आजच Download करा आणि आपल्या मोबाईल वर बातम्या मिळवा!

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुनंदाताई यांनी ताराबाई आणि अनुताईंच्या विद्यानगरीत आल्यावर प्रचंड उर्जा मिळते असे उद्गार काढून, या दोघींनी प्रतिकूल परिस्थितीत उभे केलेले कार्य पुढच्या पिढीने तंत्रज्ञानाच्या बळावर अधिक वेगाने पुढे नेण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. त्यांनी प्रगती प्रतिष्ठानतर्फे जव्हार तालुक्यातील आदिवासी भागात चालविल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. तसेच समाजसेवी संस्थांनी शासकीय मदतीची वाट पहात न बसता सामाजिक उत्तरदायीत्व म्हणून उद्योगक्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या सीएसआर फंडांकडे लक्ष वळवावे असा सल्ला देखील दिला.
दैनिक राजतंत्रचे App आजच Download करा आणि आपल्या मोबाईल वर बातम्या मिळवा!

पुस्तकाची किंमत अवघी 150 रुपये ठेवण्यात आली आहे. तूर्तास हे पुस्तक नूतन बाल संघाच्या कोसबाड मुख्यालयात व आयडियल ट्रेडर्स (डहाणू) येथे उपलब्ध असून लवकरच ते सर्वत्र उपलब्ध केले जाणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top