दिनांक 22 September 2019 वेळ 5:04 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » खोडाळा : दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार

खोडाळा : दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार

 AADARSH SHIKSHAK JILHA PURSKARदीपक गायकवाड/ राजतंत्र मिडीया

मोखाडा, दि. 27 : खोडाळा गावचे भुमीपुत्र दिनकर फसाळे यांना आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार जाहीर झालळ आहे. उद्या, 5 सप्टेंबर रोजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते पुरस्कार देऊन फसाळेंना गौरविण्यात येणार आहे. त्यांची आदर्श शिक्षक म्हणून झालेली निवड ही सत्पात्री असल्याचे सांगत त्यांच्यावर शिक्षक वृंद, विविध पक्षाचे पदाधिकारी आणि पंचायत समिती प्रशासनाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दिनकर फसाळे यांनी पालघर जिल्ह्यातील पहिली अद्ययावत डिजीटल शाळा सावरपाडा या अत्यंत दुर्गम भागात यशस्वीपणे सुरू केली आहे. त्याचबरोबर शाळाबाह्य उपक्रमांतही येथील विद्यार्थी विशेष नैपूण्य दाखवित आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा, सामाजिक कामे त्याचबरोबर शाळा परिसरातील जनतेसाठीही समाजसेवी व्यक्तींच्या संपर्कातून त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यामूळे परिसरातील जनतेबरोबरच तालुक्यामध्येही त्यांची अत्यंत चांगली प्रतिमा तयार झालेली आहे. त्यामुळेच त्यांना दिला जाणारा पुरस्कार सत्पात्री असल्याचे बोलले जात आहे.

दिनकर फसाळे यांच्याबरोबरच संगीता जाधव (वसई), पंकज पाटील (तलासरी), यशवंत लहारे (जव्हार), संजय पाटील (वाडा), अनिल पाठारे (विक्रमगड), दीपक देसले (डहाणू) आणि श्रीमती जयमाला सुर्यकांत सुर्यवंशी (पालघर) यांचाही उद्या आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार देऊन यथोचित सन्मान केला जाणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top