दिनांक 17 July 2019 वेळ 3:49 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » कुडूस : कंपनीतील सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कुडूस : कंपनीतील सांडपाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

WADA DHODIYA COMPANYकुडूस/प्रतिनिधी : कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीतील धोडीया कंपनीतून प्रदुषित सांडपाणी सार्वजनिक नाल्यात सोडल्याचा प्रकार उघडकीस आला असुन या सांडपाण्याचा परिसरातील पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होऊन शेती व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) या पक्षाने तहसीलदार राणा यांना देऊन कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.

धोडीया कंपनीत धाग्याच्या उत्पादना बरोबरच रासायनिक पावडरचे उत्पादन घेतले जाते. कंपनीत निर्माण होणारा रसायनमिश्रीत धुर बाहेरच्या वातावरणात सोडला जातो त्यामुळे वायुप्रदूषण होते. तसेच येथे उत्सर्जित होणारे सांडपाणी थेट सार्वजनिक नाल्यात सोडल्याने पुढे ते तानसा नदीत मिसळून पाणी प्रदुषित होत आहे. या प्रदुषित पाण्याचा वापर शेती व प्राण्यांना पिण्यासाठी केला जातो. तसेच हे पाणी झिरपून परिसरातील विहिरी व बोअरवेल अशा पाण्याच्या मुख्य स्रोतांवर परिणाम करत असल्याले प्राण्यांच्या व माणसांच्या आरोग्याला धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे प्रदुषण महामंडळाने अथवा वरिष्ठांनी कंपनीच्या प्रदुषणाची पाहणी करुन कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदनावर पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रमेश भोईर व वाडा तालुका अध्यक्ष सुरेश भोईर यांच्या स्वाक्षर्‍या असुन तत्काळ कारवाई न केल्यास पक्षातर्फे तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वाचा : कंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे आरोग्य, भातशेती धोक्यात

comments

About Rajtantra

Scroll To Top