दिनांक 20 June 2019 वेळ 4:44 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणूत पिसाळलेल्या कुत्रीची दहशत

डहाणूत पिसाळलेल्या कुत्रीची दहशत

दैनिक राजतंत्र अपडेट्स

डहाणू दि. २८: डहाणू शहरातील एक भटकी कुत्री पिसाळलेली असून तीच्यापासून नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. या कुत्रीचा वावर विद्युतनगर ते वडकून परिसरात असून ही बातमी लिहिली जात असताना ती वडकूनमधील आनंद विला सोसायटीच्या परिसरात फिरत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले आहे. लोकांनी स्वतःची आणि मुलांची काळजी घेणे गरजेचे ठरले आहे.

कुत्रीचा बंदोबस्त करण्यासाठी काही नागरिकांनी नगरपालिकेकडे संपर्क साधला असता, नगरपालिका प्रशासनाने हात वर करुन भटक्या कुत्र्यांबाबत काही करण्यास असमर्थता व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. या बाबत नगरपालिका प्रशासनाची भूमिका अधिकृतपणे समजू शकलेली नाही.

comments

About Rajtantra

Scroll To Top