वाड्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

0
13

हत्या की आत्महत्या गुढ कायम

वाडा/प्रतिनिधी, दि. 23 : तालुक्यातील डाहे येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास रस्त्यावरील मोरीच्या पाईपामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. रंजना राजेंद्र दिवा असे मृत महिलेचे नाव असुन काल रंजनाचा एका महिलेशी वाद झाला होता. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या, हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रंजना दिवा (वय 26) ही महिला गवंडी अंकुश भुयाळ यांच्याकडे मजूरी करत होती. आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी अंकुश भुयाळ यांची पत्नी गीता व रंजना यांच्यात अज्ञात कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास गीताने रंजनाला बस स्थानकावर बोलावून घेतले होते व तेव्हापासूनच रंजना बेपत्ता होती, असे रंजनाच्या पतीने सांगितले. आज रंजनाचा रस्त्यावरील मोरीच्या पाईपमध्ये मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वाडा पोलिसांनी त्वरित मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. प्रथमदर्शनी गीताने थायमॅट हे अतिशय विषारी औषध प्राशन केल्याचे समजते. मात्र शवविच्छेदन केल्याशिवाय तिचा मृत्यू कशामुळे झाला ते सांगू शकत नाही, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक प्रदीप जाधव यांनी दिली.

दरम्यान, पोलीसांनी गवंडी भुयाळ व गीता भयाळ या दोघांना संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email

comments